फडणवीस अन् शिंदेंसाठी आता मास्टर ब्लास्टर सचिन करणार बॅटिंग

फडणवीस अन् शिंदेंसाठी आता मास्टर ब्लास्टर सचिन करणार बॅटिंग

Sachin Tendulkar :  क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असणार आहे. राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सचिनची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सचिन करणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन अन् सचिन तेंडुलकर उपस्थित होते.

तिकीट नाकारलं, चव्हाण-वडेट्टीवारांनी राहुल गांधींपर्यंत फिल्डिंग लावली अन् धानोरकर ‘खासदार’ झाले….

या अभियानासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी याविषयीची माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे स्माइल अ‍ॅम्बेसेडर म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार आहे. यावेळी सचिननेदेखील आपले मनोगत व्यक्त केले.

Letsupp Special : विश्वस्तपद, आंदोलन अन् वाद; जेजुरीची ग्राउंड रिअ‍ॅलिटी नेमकी काय?

वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी आज सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम संपन्न झाला. सचिन तेंडुलकर यांची या अभियानासाठी नियुक्ती केल्याने या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या वर्षापासून महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान म्हणजेच स्वच्छ मुख अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube