DCP says Do not multiply issues, and discussion off-track in Bombay High Court exam Chhatrapati Sambhajinagar protest : मुंबई हायकोर्टातील लिपीक पदासाठी (Paper leak) रविवारी (16 ऑगस्ट) राज्यभर घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण लागल्याचे चित्र अनेक परीक्षा केंद्रांवर पाहायला मिळाले. परीक्षा प्रक्रियेत आलेल्या अडथळ्यांमुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली असून, परीक्षेच्या आयोजनावरच विद्यार्थ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगरात या नाराजीचे रूपांतर थेट आंदोलनात झाले. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे डीसीपी रत्नाकर नवले यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्याशी वाद घलणाऱ्यांना खडसावलं यावेळी सीजेपीचे अभिजीत दिपकेही तेथे होते.
नेमकं काय म्हणाले DCP रत्नाकर नवले?
मुंबई हायकोर्टातील लिपीक परीक्षेतील गोंधळाविरोधात छ. संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी रात्री उशीरा डीसीपी रत्नाकर नवले यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, तुम्ही तुमचा मु्द्दा लिखित दिला आहे. मात्र निर्णय दोन अन् पाच तासांत होऊ शकत नाही. मी देखील विद्यार्थी होते. त्याच प्रक्रियेतून आलो आहे. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. त्याप्रमाणे वागलं बर राहिलं.
यावेळी काही लोक नवलेंशी विद्यार्थ्यांची बाजू घेऊन हुज्जत घालण्याचा प्रयत्न करत होते. त्यांमुळे नवले यांनी विद्यार्थी आणि हायकोर्ट परीक्षेसंबंधित लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. मी देखील चर्चेत होतो. त्यामुळे मुद्दे वाढवू नका अन् मुद्दे भरकटवू नका. असं म्हणत त्यांच्याशी वाद घलणाऱ्यांना खडसावलं यावेळी सीजेपीचे अभिजीत दिपकेही तेथे होते.
एसआयआर फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस; महाराष्ट्रात बंगाल पॅटर्न वापरण्याचा कट रोहित पवारांचा आरोप
दरम्यान रविवारी दुपारीच परीक्षेतील गोंधळाची माहिती मिळताच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरातील परीक्षा केंद्र गाठले. त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तांत्रिक कारणांमुळे परीक्षा सुरळीत पार पडली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी करत, परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आणि भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नयेत, अशी मागणी दीपके यांच्यासमोर मांडली. तसेच रात्री उशीरा DCP चर्चा करत असताना देखील दिपकेंनी विद्यार्थ्यांना पोलीसांना सहकार्य करून वाद न घालण्याचं आवाहन केलं.
