डोश्यात चक्क मृत उंदीर! बोरीवलीतील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, ग्राहकाला उलट्या, कारवाईची मागणी

Dead Rat Found in Dosa : राज्यभरात अन्न व औषध प्रशासन भेसळयुक्त अन्नाविरोधात कारवाई करत असताना एका हॉटेलमधील डोशात चक्क मृत उंदीर आढळला.

Dead Rat Found in Mysore Masala Dosa at Borivali Hotel

Dead Rat Found in Mysore Masala Dosa at Borivali Hotel

Dead Rat Found in Mysore Masala Dosa at Borivali Hotel: राज्यभरात अन्न व औषध प्रशासन भेसळयुक्त अन्नाविरोधात कारवाई करत असताना एका हॉटेलमधील डोशात चक्क मृत उंदीर आढळला. झालं असं की, मुंबईतील बोरिवली स्टेशनच्या एल. टी. रोडवरील शॉपिंग सेंटरसमोर असलेल्या राधाकृष्ण हॉटेलमध्ये अमित त्रिवेदी या ग्राहकाने म्हैसूर मसाला डोसा ऑर्डर केला होता.

स्फोटके ठेवल्याप्रकरणात मोठी अपडेट; सचिन वाझेला जामीन, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही दिलासा

अमित त्रिवेदी आपल्या दोन भाऊ आणि मुलासोबत म्हैसूर मसाला डोसा खाण्याचा आनंद घेत होते. डोश्याचे काही घास खाल्यानंतर त्यांना डोश्यात चक्क एक मृत उंदीर आढळला. हे पाहून त्रिवेदींना मोठा धक्काच बसला आणि त्यांना थोड्या वेळाने उलट्या झाल्या. त्यांनी तातडीने बोरीवली पोलिस ठाण्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.

कारागृहातून खंडणी मागितल्या प्रकरणात निलेश घायवळ निर्दोष; मोक्का कोर्टाचा निर्णय

या घटनेमुळे हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यभरात भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नाविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना, या प्रकरणाचीही गांभीर्याने दखल घेऊन संबंधित हॉटेलची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version