Download App

Congress : दुष्काळी तालुका जाहीर करा! भर पावसाळ्यात आमदाराचं विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन…

Assembly Session : सांगली जिल्ह्याच्या जनतेला पाणी टंचाई कायमच भासत असल्याने सांगली जिलह्यातील जत तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार विक्रम सावंत यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केलं आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरु असतानाही विक्रम सावंत यांनी आंदोलन केलं आहे. दरम्यान, सावंत यांच्या ठिय्या आंदोलनामध्ये आमदार जयंत पाटलांसह इतर आमदारांना पाठिंबा दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. या गावांत पाण्याचे दुर्भिक्षच असते. यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने जनतेला पाण्याची टंचाई भासत आहे. राज्य सरकारने या पाणी टंचाई प्रश्नाची दखल घेऊन पाण्याच्या टॅंकरची व्यवस्थ केली पाहिजे, अशीही मागणी सावंत यांनी यावेळी केली आहे.

तसेच इतरही महत्त्वाच्या उपाययोजना करायला हव्यात. या भागातील काही गावे आम्हाला कर्नाटकात पाठवा अशी मागणी करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, शासनाने यात वेळीच लक्ष घालावे.

कर्जत MIDC चा वाद चिघळला! शिंदेंनी रोहित पवारांकडे मागितला कर्जत-जामखेडचा हिशोब

म्हैसाळ योजनेचं काम हाती घ्या :
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना त्यांनी म्हैसाळ विस्तारीत पाण्याची योजना आखली होती. त्यानंतर या योजनेच्या सर्व गोष्टींची पूर्तता झाली होती. आता राज्य सरकारने तत्काळ या योजनेचं काम हाती घ्यायला हवं, अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, जत तालुक्यााल नेहमीच दुष्काळाला सामोरं जावं लागतं. यंदा तालुक्यात अधिकचा पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. समाधानकारक पाऊन न झाल्याने शेतकऱ्यांचे शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे अनेक गावांत पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागलीयं. आता आमदार सावंत यांच्या आंदोलनानंतर जत तालुक्याच्या दुष्काळासंदर्भात नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us