Download App

अजित पवारांनी ओघाने आपली उमेदवारी जाहीर केली; दिपक चव्हाण तुतारी फुंकणार? नक्की काय घडलं

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यासह दीपक चव्हाणही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

  • Written By: Last Updated:

Deepak Chavan : विधानसभा तोंडावर आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना यांना रोज राजकीय धक्क्यावर धक्के बसत आहेत. अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा असतानाच (Deepak Chavan) आता काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी फलटणमधून उमेदवारी जाहीर केलेले दीपक चव्हाण देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे अजित पवारांना असे एकावर एक धक्के का बसत आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.

न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झालीये; तरुंगवासाच्या शिक्षेनंतर संजय राऊत कडाडले

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी दीपक चव्हाण यांना फोनवरुन उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, तेच दीपक चव्हाण अजित पवारांची साथ सोडणार आहेत अशी माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. त्यावर बोलताना ‘अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओघाने आपली उमेदवारी जाहीर केली होती. अजून जागावाटप झाली नसल्याने उमेदवारीचं काही ठरलं नाही, असं दीपक चव्हाण यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ते काहीतरी वेगळा निर्ण घेणार आहेत अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

तुतारी हाती घेण्याची चर्चा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते रामराजे निंबाळकर यांनी साताऱ्यात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राजराजे निंबाळकर यांच्याशी जवळीक असलेले फलटणचे दीपक चव्हाण देखील याच मेळाव्यातून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात चांगले वातावरण आहे, त्यामुळे अनेक तुतारीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

follow us