न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झालीये; तरुंगवासाच्या शिक्षेनंतर संजय राऊत कडाडले…

  • Written By: Published:
न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झालीये; तरुंगवासाच्या शिक्षेनंतर संजय राऊत कडाडले…

Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या केसमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊ (Sanjay Raut) यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात माझगाव कोर्टाने (Mazgaon Court) त्यांना दोषी ठरवत 15 दिवसांची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम मेधा यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. यावरून राऊतांनी भापज आणि न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे.

Jigra Trailer: भावाला वाचवण्यासाठी ‘सत्या’ सर्व मर्यादा ओलांडणार, ‘जिगरा’चा खतरनाक ट्रेलर रिलीज 

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार? हे अपेक्षित होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना मला तुरुंगात टाकायचे आहे. मी त्यासाठी तयार आहे. पण, मीरा भाईंदरमधील शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी केला नव्हता, असं राऊत म्हणाले.

Jigra Trailer: भावाला वाचवण्यासाठी ‘सत्या’ सर्व मर्यादा ओलांडणार, ‘जिगरा’चा खतरनाक ट्रेलर रिलीज 

ते म्हणाले, मीरा भाईंदर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी हा दावा केला. तसंच मीरा भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होतं. याविरोधात विधानसभेतही चर्चा झाली होती. विधानसभेतील चर्चेनंतर एक आदेशही पारित करण्यात आला होता. मी यावर फक्त प्रश्न विचारले होते, असं राऊत म्हणाले.

ते म्हणाले, या प्रकरणी मी पुरावेही दिले होते. मात्र न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालं आहे. तरीही आम्ही न्यायालयाचा आदर करतो. आम्ही वरच्या न्यायालयात जाणार, आमच्याकडे पुरावे आहेत, मला 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरीही मी सत्य बोलायचं थांबणार नाही, असं राऊत म्हणाले.

एका वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींना फासावर लटकवल होतं, आता संजय राऊतांना फासावर लटकवलं जातं. जसं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की, न्याय व्यवस्था कोणाची तरी ऱखेल झाली हे स्पष्ट दिसतं. आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो, आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ, असंही ते म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube