Download App

आमदार संजय गायकवाडवर कारवाईस दिरंगाई, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Nana Patole : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जेवणात वास येत असल्याने आमदार निवासातील कॅन्टीगमधील

  • Written By: Last Updated:

Nana Patole : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जेवणात वास येत असल्याने आमदार निवासातील कॅन्टीगमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधक महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात सरकारने दिरंगाई केली असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता पक्षाचे आमदार आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे होती. कॅन्टीगवर कारवाई झाली पण आमदारावर कारवाई झाली नाही. गोर गरीब शब्द सरकारच्या डिक्शनरीमध्ये राहिलेला नाही. कारवाई करण्यात दिरंगाई करण्यात आली असं माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले.

तर दुसरीकडे नाना पटोले यांनी छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भुमरे यांनी मोठे दारूचे अभियान सुरू केले आहे. ज्यांचा आता दारूचा संबध नव्हता ते ही करत आहे. दारूयुक्त महाराष्ट्र असे सरकारचे धोरण राहणार आता. अनेक सरकार मधील मंत्री हे दारू विक्रेते होणार आहे. असं नाना पटोले म्हणाले.

Infinix Hot 60 5G+ अखेर बाजारात लॉन्च, मस्त फीचर्ससह देणार iQOO ला टक्कर, किंमत फक्त…

तसेच माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली आहे. महाराष्ट्रात किती मतदान झाले हे आम्हाला दाखविले नाही. याबाबत आयोगाने माहिती लपवली आहे. 78 लाख मत जी आहे त्या मतावर हे सरकार आले असल्याची टीका नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केली.

follow us