दाक्षिणात्यांनीच डान्सबार आणि लेडिजबारने महाराष्ट्र नासवला; राड्यानंतर संजय गायकवाडांचं पुन्हा अजब विधान

दाक्षिणात्यांनीच डान्सबार आणि लेडिजबारने महाराष्ट्र नासवला; राड्यानंतर संजय गायकवाडांचं पुन्हा अजब विधान

Sanjay Gaikwad Controversial Statement Bbout South Indian People and Dance Bar : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि कृत्यांनी चर्चेत असणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आता पुन्हा एकदा एक अजब विधान केलं आहे. यावेळी गायकवाडांच्या निशाण्यावर दाक्षिणात्य लोक आले आहेत. दाक्षिणात्यांनीच डान्सबार आणि लेडिजबारने महाराष्ट्र नासवला. असं विधान गायकवाड यांनी केलं. आमदार निवासातील कॅन्टनच्या वादावर बोलतानाच त्यांनी हे विधान केले आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

आमदार निवासातील कँटीनमध्ये निकृष्ट जेवण मिळालं म्हणून आ. गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी येथील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मुद्द्यावर ‘मला जर कुणी विष खाऊ घालत असेल तर मी काय त्याची पूजा करू का, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही. जर कुणी अंगावर चालून येत असेल तर त्याला भिडा हीच त्यांची शिकवण होती. त्याच पद्धतीने मी प्रतिक्रिया दिली. मला याचा कोणताही पश्चात्ताप नाही’, अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

खबरदार! ‘व्हॉट्सअप’वर ज्युनियर्सना त्रास दिला तर.. UGC चा गंभीर इशारा; नव्या नियमांत काय ?

त्याचबरोबर त्यांनी यावेळी दाक्षिणात्य लोकांना देखील टार्गेट केले आहे. ते म्हणाले की, माझ्यावर विरोधक या प्रकरणी टीका करत आहेत. मात्र विरोधक ज्या त्या कॅन्टीनमधील दाक्षिणात्य लोकांची बाजू घेत आहेत. त्याच लोकांमुळे महाराष्ट्र नासला आहे. कारण त्यांनीच डान्सबार आणि लेडिजबार आणले. त्यातून तरूणाई बरबाद झाली. असं म्हणत गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) अजब विधान केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासातील कॅन्टीगमधून 8 जुलैच्या रात्री जेवण्याती ऑर्डर दिली होती. कॅन्टीग कर्मचाऱ्यांकडून आमदार गायकवाड यांच्या रुममध्ये ऑर्डरनुसार जेवण देखील पुरवण्यात आले होते मात्र जेवणाक देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळं होतं आणि त्यात वास येत होता असा आरोप करत आमदार गायकवाड यांनी कॅन्टीग व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याने विरोधक विरोधक आमदार गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे.

अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा ‘सायलेंट स्ट्राइक’? अचानक दिल्ली गाठली, कारण…

तर दुसरीकडे 8 जुलैच्या रात्री वरण भात आणि पोळीची ऑर्डर केली होती. ऑर्डर आल्यानंतर मी भातासोबत वरण मिक्स करुन पहिला घास घेताच मला खराब वाटला. मला वाटला वरणामध्ये चिंच असेल म्हणून मी पोळीसोबत दुसरा घास घेतला असता मला वोमिटिंग झाला. यानंतर मी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते असं माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube