‘तुम्ही मला 91 पासून संधी देत मला साथ दिली, घरातले काही लोक मात्र साथ देत नाही’; अजित पवारांनी बोलून दाखवली खदखद

राजकीय कार्यक्रमात भाषण करता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा कुटुंबातील मतभेदावर भाष्य करत अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Untitled Design (125)

Untitled Design (125)

Deputy Chief Minister Ajit Pawar’s emotional appeal : वेगळ्या भाषांच्या शैलीमुळे चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी बारामतीकरांपुढे(Baramati) त्यांनी मन मोकळं केलंय. त्यांच्या वक्तव्याची संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा पाहायला मिळत आहे. एका राजकीय कार्यक्रमात भाषण करता असताना त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबातील मतभेदावर भाष्य करत अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सगळ्यात बारामतीकरांची साथ महत्वाची असली तरीही कुटुंबाकडून तशी साथ मिळत नसल्यच वक्तव्य यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलं. नगर परिषद निवडणुकीच्या सांगता सभेच्या माध्यमातून अजित पवार(DCM Ajit Pawar) यांनी बारामतीकरांशी भावनिक संवाद साधला.

भूकाळाची आठवण करून देत ते म्हणाले की, 1991 साली मी तुमच्या सर्वांचा खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा राहिलो होतो. त्यावेळी देशात एक दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे राजीवजी आपल्यातून निघून गेले. त्यामुळे निवडणूक एक महिना लांबल्या. यंदा 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक राज्यात पार पडल्या, काही ठिकाणचं मतदान झालं असून काही ठिकाणी प्रकरण कोर्टात गेल्याने 20 तारखेला त्या निवडणूक घेण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. यावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितलं की, या सर्व नगरपरिषद आणि नागरपालिकांची मतमोजणी 21 तारखेला होणार आहे.

निदर्शन, हिंसा अन् हल्ले; कोण आहे शरीफ उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूनंतर बांगलादेश पुन्हा पेटला

असं म्हणताना पवारांनी ‘मी शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारा कार्यकर्ता आहे’ या वाक्याचा पुनरुच्चार केला. किंबहुना 10 जुलै 1999 ला ज्यावेळी शरद पवारांनी पक्षाची स्थापना केली तेव्हाही काही वेळेस सर्व दिग्गजांनी हाच विचार आणि भूमिका सर्वांसमोर मांडली असं सांगताना 26 वर्षांमध्ये आलेल्या चढ- उतारांकडे त्यांनी लक्ष वेधलं.

‘तुम्ही मला 91 पासून संधी देत मला साथ दिली, पण घरातले काही लोक मात्र साथ नाही देत. मात्र आजपर्यंत तुम्ही मला खासदार, आमदार केलं. कधी मी सरकारमध्ये होतो कधी नव्हतो परंतु त्याचा विचार बारामतीकरांनी कधी केला नाही. विरोधी पक्षात असलो तरी बारामती शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, ग्रामीण भागाचा कसा विकास करता येईल, ज्या जिल्ह्याने मला संधी दिली त्या जिल्ह्याचा कायापालट कसा करता येईल याचा विचार मी केला आहे.

Exit mobile version