भर कार्यक्रमात बड्या उद्योगपतीकडून CM फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख अन्…
Sajjan Jindal On Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेच्या राजकाणाचा उल्लेख करुन 19 डिसेंबरनंतर
Sajjan Jindal On Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेच्या राजकाणाचा उल्लेख करुन 19 डिसेंबरनंतर भारतात मराठी माणूस पंतप्रधान होणार असा दावा केल्यानंतर अनेक चर्चांना उधान आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात चव्हाण यांच्या या दाव्यानंतर सुरु झाली आहे. तर आता एका कार्यक्रमात व्यवसायिक सज्जन जिंदल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम (World Hindu Economic Forum) या कार्यक्रमात बोलताना व्यवसायिक सज्जन जिंदल (Sajjan Jindal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख केला मात्र चूक लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत दुरुस्ती केली. या कार्यक्रमात पुढे बोलताना मात्र एक दिवस फडणवीस पंतप्रधान होणार असं सज्जन जिंदल म्हणाले.
नेमकं काय म्हणाले सज्जन जिंदाल?
या कार्यक्रमात बोलातना सज्जन जिंदाल (Sajjan Jindal On Devendra Fadnavis) म्हणाले की, पंतप्रधान मला बोलले आपल्याला 500 मिलियन टन स्टील बनवायचे आहे. आपल्याला 300 मिलियन टनवर थांबायचे नाही. चीनपेक्षा आपण कमी नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत आत्मनिभर्र व्हयाचे आहे. आपल्याला जगासाठी स्टील बनवायचे आहे. आपल्या देशात उत्पादन वाढवायचे आहे. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. कारण आज आपण पंतप्रधानांना ऐकायला आलोय असं त्यांनी म्हटलं मात्र चूक लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) शब्द वापरला आणि पुढे म्हणाले की, माझ्याकडून तोंडातून चुकीने शब्द निघाला परंतु एक दिवस ते पंतप्रधान होतील. आपल्या हिंदूंमध्ये असं बोलले जाते, जर एखादा शब्द तोंडातून निघाला असेल तर ते होते. आपल्या जीभेवर सरस्वती विराजमान असते असंही ते म्हणाले.
Truecaller चा खेळ संपला? फोन वाजताच टेलिकॉम डेटाबेसवर आधारित कॉलर नेम दिसणार ; लागू होणार CNAP सेवा
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?
19 डिसेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप होईल आणि भारताचा पंतप्रधान बदलेल अन् मराठी माणूस पंतप्रधान होईल आणि ती व्यक्ती भाजपचीच असू शकते असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले होते. तसेच अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्रायलचा गुप्तहेर होता त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.
