मोठी बातमी! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडं बीड अन् पुण्याचं पालकमंत्रीपद

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे.

News Photo   2026 02 03T151628.671

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडच्या नव्या पालकमंत्री, शासनाचा आदेश जारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर (Pawar) पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांतर पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद त्या स्वीकारणार का? असा प्रश्न विचारला जात होता, त्यावर आता पडता पडला आहे. सुनेत्रा पवार यांनी बीड आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी होत होती.

अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे.

भाकरी फिरणार! पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?; पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द

दादांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राजभवन येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार असणार आहेत.

Exit mobile version