Download App

मोठी बातमी : ‘डेडिकेटेड टू कॉमने मॅन’ एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवणार; धमकीच्या ई-मेलने खळबळ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर आहेत.

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. ईमेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून, पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेतला जात आहे. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात हा धमकीचा मेल पाठवण्यात आला असून, यात एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे. (DCM Eknath Shinde Get Death Threat)

मोठी बातमी : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; नाशिक जिल्हा न्यायालयाचे आदेश

पोलिसांकडून तपास सुरू

गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. तसेच हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी सुरु आहे. अज्ञात  व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे.

VIDEO : शरद पवारांची मोठी फसवणूक…संजय राऊतांची आगपाखड, शिंदेंवर हल्लाबोल

शिंदे दिल्ली दौऱ्यावर 

एकीकडे शिंदे यांना जिवे मारण्याच्या धमकीनंतर मोठी खळबळ उडाली असून, या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही सांगितले जात आहे.

follow us