Desecration of Chhatrapati Shivaji Maharaj statue in Rahuri : राज्यात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे तसेच त्यांचा अवमान करण्याच्या घटना काही केल्या थांबताना दिसून येत नाही. यातच नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये असंच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील राहुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येवून नगर मनमाड हायवेवर रास्ता रोको केला. या घटनेनंतर परिसरात मोठा तनाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. यावेळेस शांतता ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
चर्चा करतो, पण माझं ऐकलं की भलं होतं; अजितदादांची अमित देशमुख अन् विश्वजित कदमांना थेट ऑफर?
राहुरी शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे आज (बुधवार) दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून विटंबना केली. काही वेळाने तरूण तालीममध्ये गेले असता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे लक्षात आले. काही वेळातच शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या.
रास्ता रोको ते राहुरी शहर बंद
हिंदू प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याने संतप्त झालेल्या शेकडो शिवप्रेमींनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवप्रेमींनी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी पोलीस प्रशासनाने आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी शिवप्रेमींनी केली. जवळपास तासभर चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे राहुरी शहर बंद ठेवण्यात आले असून शहरात तणावपुर्ण शांतता आहे.