चर्चा करतो, पण माझं ऐकलं की भलं होतं; अजितदादांची अमित देशमुख अन् विश्वजित कदमांना थेट ऑफर?

चर्चा करतो, पण माझं ऐकलं की भलं होतं; अजितदादांची अमित देशमुख अन् विश्वजित कदमांना थेट ऑफर?

Ajit Pawar Offer to Amit Deshmukh and Vishvjeet Kadam : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान अनेक नेत्यांची राजकीय फटकेबाजी पाहायला मिळते. गेल्या वेळी अजित पवार यांनी विश्वजीत कदम यांना सुनावले होते. मात्र यावेळी थेट त्यांनी अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांना खुली ऑफर दिली आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे याचं कारण नेमकं काय पाहुयात…

Jaykumar Gore : भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार अजून किती कुटाणे करणार? रोहित पवारांनी केला धक्कादायक खुलासा

सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले की, मला मागे बसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना विशेषता सांगायचा आहे की, गेल्या वेळी पिंपरी चिंचवडमध्ये बनसोडे अण्णांनी माझं ऐकलं. राष्ट्रवादीचा फॉर्म भरला त्यामुळे बर झालं. त्यावेळी ते आमदार झाले. त्यामुळे राजकारणात माझं ऐकलं की कुणाचं किती भलं होतं? बघा हे आता अनेकांच्या लक्षात आलं असेल. सन्माननीय विश्वजीत सन्माननीय अमितजी आपण नेहमी चर्चा करतो. असं म्हणत अजित पवारांनी त्या दोघांना एकप्रकारे खुली ऑफरच दिली असल्याचं म्हटलं आहे.

पतंगरावांनी केलेलं टीकवं म्हणजे झालं…

दरम्यान गेल्या वेळी अजित पवारांनी विश्वजित कदमांना टोला लगावला होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सध्या विधिमंडळामध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितलं होतं की, अमित देशमुखसाहेब आणि कदमसाहेब तुम्ही दोघेही फार हुशार माणसे या सभागृहात आहात. असेही म्हटलं. त्यावर विश्वजीत कदम म्हणाले, आम्ही ऐकतोय आणि शिकतोय. त्यावर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत म्हटलं की, नाही, तू ऐकतोय पण भारतीय विद्यापीठाचे सगळं पतंगरावांनी करून ठेवले. त्यामुळे तू नुसता ऐकतोय. तू काय केले? तू ते भारती विद्यापीठाचे कारभार नुसतं टिकवून दाखवं म्हणजे झालं आणि ते टिकवण्यासाठी जयंतरावांचा सल्ला घे कुठे काय कमी झालं तर…

महाडमध्ये ठाकरे गटाला खिंडार! स्नेहल जगताप यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश

यावर लगेचच विश्वजीत कदम यांनी अजित पवारांना उत्तर देताना म्हटलं की, भारती विद्यापीठाचं कार्यक्षेत्र मी वाढवतोय. मात्र त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, ते वाढलेलं अजून मला दाखवलं नाही. त्यामुळे आज सभागृहात विश्वजीत कदम आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचा पाहायला मिळालं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube