…’त्या’ प्रकरणात मला क्लिनचिट मिळाली; वडेट्टीवार यांच्या आरोपांना देवांग दवे यांनी काय दिलं उत्तर?

निवडणूक आयोगाचा मीडिया हँडलिंगाचा भाग हा भाजपचा कार्यकर्ता असलेले देवांग दवे कस का सांभाळत आहेत? मतदार यांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे

Dave

Dave

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच राज्यात मतदार यादीवच्या गोंधळावरून राजकारण तापलं आहे.  विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. (Commission) विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मतदार यादीमधील त्रूटी दाखवण्यात आल्या, तसंच, जोपर्यंत या त्रूटी दुरूस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणूक सहा महिने पुढे ढकलावी अशी मागणी देखील करण्यात आली, याच दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजचे कार्यकर्ते असलेले देवांग दवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

निवडणूक आयोगाचा मीडिया हँडलिंगाचा भाग हा भाजपचा कार्यकर्ता असलेले देवांग दवे कस का सांभाळत आहेत? मतदार यांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता, दरम्यान त्यानंतर आता देवांग दवे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे, दवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आयोगाचा मोठा निर्णय; केंद्रीय निवडणूक आयोगाला केली विनंती

2019 मध्ये साकेत गोखले नावाचा माणूस असे आरोप करत होता. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी झाली होती, या चौकशीमध्ये माझा आणि निवडणूक आयोगाचा काहीही संबंध नाही, असं आढळून आल्यानं मला क्लिनचिट मिळाली आहे. 2019 नंतर विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप केले, त्यांच्याकडून फेक नरेंटिव्ह पसरवण्याचं काम होत आहे, त्याचाच हा भाग म्हणजे त्यांनी आता व्होट चोरीचा आरोप केला आहे, असं यावेळी देवांग दवे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधकांमध्ये कन्फ्यूजन आहे, त्यांनी आपसात चर्चा करून त्यांचं आधी कन्फ्यूजन दूर करावं. बिहारमध्ये विरोध करायचा आणि महाराष्ट्रात मागणी करायची निवडणुका लवकर घ्या म्हणून, आणि आता पुन्हा युटर्न घ्यायचा. त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे, त्यामुळे पुढची स्टॅटजी काय? त्यावर त्यांनी विचार करायला पाहिजे, असं यावेळी दवे यांनी म्हटलं आहे.

 

Exit mobile version