Devendra Fadanvis Anounces 15 thousand per yaer for PMKSN : शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार देणार. पीएम किसान योजनेमध्ये आणखी भर घालण्यात येणार आहे. आज नागपूरमध्ये वनामती सभागृहातमध्ये किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधीचा 19 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जामा करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधीचा 19 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जामा करण्यात येणार आहे. ही योजना मोदी यांनी सरू केली. तेव्हा त्यावर काहींनी टीका केली. मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या काळात त्याला याची मदत होत आहे. त्याला अनुसरून राज्यात नमो किसान निधी योजना सुरू केली. त्यात केंद्राचे 6 हजार आणि आता राज्य सरकार देखील 6 हजार रूपये देते. त्यात आता 3 हजार रूपये वाढवण्यात येणार आहेत. ही मोठी घोषणा नागपूरमध्ये बोलताना फडणवीसांनी केली.
‘कॉंग्रेस’ हिंदुद्वेषी अन् मुस्लिम लीगची बी टीम; राहुल गांधींचं हिंदुत्व काढत राणे बरसले…
तसेच यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात काही शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मी गेल्या वेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसंधारणाचे काम केले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यांचा उल्लेख त्यांनी केला.
सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचे फायदे मिळावे यासाठी काम केलं. शेतकरी गटांना रोजगारक्षम उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान दिलं आहे. तसेच अॅग्री स्टॅट योजनेतून शेतकऱ्यांच्या पीक घेण्यापासून ते त्यांना विक्री करताना मिळणाऱ्या भावा पर्यंत त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहचणार आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिली.