नाक घासून माफी मागा, नाहीतर भारिपसून ते आतापर्यंतचं सगळंचं बाहेर काढू…; अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना इशारा

Sushma Andhare : दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात (Akhil Bhartiy Marathi SAhitya sammelan) शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी (Neelam Gorhe) ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केलेत. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळतं, असा आरोप गोऱ्हे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण पेटलं आहे. दरम्यान, आता सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) नीलम गोऱ्हें विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली.
‘कॉंग्रेस’ हिंदुद्वेषी अन् मुस्लिम लीगची बी टीम; राहुल गांधींचं हिंदुत्व काढत राणे बरसले…
नीलम गोऱ्हे बेईमान…
सुषमा अंधारेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अंधारे म्हणाल्या की, नीलम गोऱ्हेंनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली. नंतर भारिपमध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. मात्र, प्रकाश आंबेडकरांशी त्यांनी बेइमानी केली. ईमानदारी, प्रामाणिकपणा हे शब्द त्यांच्या कोशात नाही. पवार साहेबांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेइमानी केली. मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही. लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हेच त्यांनी केलं, अशी टीका अंधारेंनी केली.
२०१७ ते २०२२ पर्यंत त्यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही, असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला.
२ मर्सिडीज दिल्या असं म्हणत असतील तर त्यांनी त्यांच्या २ मर्सिडीज कुठून आणल्या? त्यांची २५० करोडची मालमत्ता कुठून आली? असा सवाल करत ही मालमत्ता आता तपासावी लागेल, असं अंधारे म्हणाल्या.
आमदारकीसाठी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले, पण उमेदवारी दिली नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
एकनाथ शिंदेंकडे कलेक्शनचं कामं होतं, असं गोऱ्हे म्हणाल्या. एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनाच माहिती असेल की कलेक्शन किती होतं. गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे, नाहीतर नाक घासून माफी मागावी, असंही अंधारे म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे यांनी कर्तृत्व नसताना अनेक पदं भूषवली. भारिपमध्ये असतानापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील, नीलम गोऱ्हेंनी तशी वेळ येऊ देऊ नये, असा इशारा देखील सुषमा अंधारे यांनी दिला.
पुढं त्या म्हणाल्या, पक्षाची प्रवक्ता म्हणून मी नीलम गोऱ्हेंवर अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. माझी लिगल टीम सर्व गोष्टींवर काम करत आहे. हा अब्रु नुकसानीचा दावा किती असेल, त्याची रक्कम किती असेल हे संध्याकाळपर्यंत कळवले जाईल, असंही अंधारेंनी सांगितलं.