‘कॉंग्रेस’ हिंदुद्वेषी अन् मुस्लिम लीगची बी टीम; राहुल गांधींचं हिंदुत्व काढत राणे बरसले…

Nitesh Rane : कॉंग्रेस हा हिंदुद्वेषी पक्ष असून मुस्लिम लीगची बी टीम आहे, या शब्दांत मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) जोरदार बरसले आहेत. यावेळी बोलताना राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं हिंदुत्व काढत जहरी टीका केलीयं. राहुल गांधी यांना कधी कुंभमेळ्यात स्नान करताना पाहिलंय का? असा थेट सवाल राणे यांनी राहुल गांधी यांना केलायं.
मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो; मात्र, नथुराम गोडसे हा नीच आणि..साहित्यिक सबनीस भडकले
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, काँग्रेस हिंदुद्वेषी पक्ष असून मुस्लिम लीगचीच बी टीम आहे. राहुल गांधी यांना कधी स्नान करताना पाहिलंय का? त्यामुळे आता विजय वडेट्टीवारांकडून काय अपेक्षा करणार, दुसरी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. दिल्लीत बसलेल्या बॉसला खूश करण्यासाठी हिंदूंना शिव्या घालाव्या घालतील, तरच आमदारकी टिकणार आहे, हिंदुंना 100 शिव्या घाला अन् काँग्रेसचे पद मिळवा असं ते समीकरण असल्याची टीका नितेश राणे यांनी केलीयं.
वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान मोदींचं भाष्य; ‘मन की बात’मधून देशवासियांना दिला ‘हा’ सल्ला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. दरम्यान, या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, नरेंद्र महाराजांचं काम अक्कलवासी वडेट्टीवारांनी पाहावं, नरेंद्र महाराजांएवढं काम करायचं असेल तर त्याला शंभर जन्म घ्यावे लागतील, असा टोला राणे यांनी वडेट्टीवारांना लगावलायं.
अहिल्यानगरच्या मढी येथील यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकाला परवानगी न देण्याचा निर्णय मढीच्या ग्रामस्थांनी घेतलायं. या निर्णयाचं आम्ही स्वागत करुन ईस्लाममध्ये मुर्तीपुजेला परवानगरी नाही. ते नवरात्रीमध्ये हिंदुंच्या नावे देऊन आतमध्ये प्रवेश मिळवत आमच्या माताभगिनींना टार्गेट करतात, जे देवी देवतांना मानत नाही तर त्यांनी तिथं येऊन व्यवसाय का करावा? असा सवालही राणे यांनी केलायं.