संजय राऊत हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; मंत्री नितेश राणे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

  • Written By: Published:
संजय राऊत हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; मंत्री नितेश राणे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Nitesh Rane on Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्य्स्फोट भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. (Nitesh Rane ) तर, संजय राऊत यांनी आपली लंगोट सांभाळावी नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरेमुळे उबाठामध्ये जी खदखद आहे, त्यावर संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहावे. असंही मंत्री नितेश राणे म्हणाले. उद्धव ठाकरे यांना स्वतःचा धर्म नाही, उद्धव ठाकरे यांचे राजकीय धर्मांतरण झाले आहे.अशी तिखट प्रतिक्रिया ही मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मते जाणून घ्यावी, संजय शिरसाट आमचे मित्र आहे त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा. असल्याचे ही नितेश राणे म्हणाले.

महापालिका निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊत म्हणाले, स्बळाचा नारा फक्त मुंबईपुरता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे, असा दावा संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक सदरातून केला आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंध राहिलेले नाहीत, असा खळबळजनक गौप्यस्फोट ही खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामनातील रोखठोक या सदरातून केला आहे.

नावं सरकारकडे आली

महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही रोहिंग्या मुसलमानांना आम्ही राहू देणार नाही. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राज्यात सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. मात्र पुढीलकाळात या कारवाईचा वेग अधिक तीव्र केला जाणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सरकारी यंत्रणेत जे अधिकारी खोटी कागदपत्र करण्यास रोहिंग्या मुसलमानांना मदत करतात त्यांची नाव सरकारकडे आली आहे. त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube