आमदारकीसाठी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले, पण उमेदवारी दिली नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

Vinayak Pandey : दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात (Akhil Bhartiy Marathi SAhitya sammelan) शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी (Neelam Gorhe) ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केलेत. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळतं, असा आरोप गोऱ्हे यांनी केला. यानंतर ठाकरे गटातून एकच संताप व्यक्त केला जातोय. आता ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडेंनी (Vinayak Pandey) मोठा गौप्यस्फोट केला आहे.
..आम्ही खोलात गेलो, तर मुश्किल होईल; नीलम गोऱ्हेंवर राऊतांनी केलेल्या पलटवारावर शिरसाठांचा वार
विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही, असा आरोप पांडे यांनी केला.
विनायक पांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मी आणि अजय बोरस्ते दोघेही मध्य नाशिकमधून इच्छूक होतो. आमच्या दोघांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते. नीलम गोऱ्हेंचा भैय्या बहाते कार्यकर्ता होता. त्याने मला विचारलं की तिकीटासाठी प्रयत्न करायचं का? तेव्हा मी हो सांगतिलं. त्याने मला नीलम ताईंकडे नेलं, तेव्हा नीलम ताईंनी मला सांगितलं की, इतके-इतके पैसे द्या, तुम्हाला उमेदवारी आणून देते. आम्ही काही रक्कम दिली. पण, पैसे देऊनही मला तिकीट न देता अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी मी नीलमताईंना फोन लावले पण त्यांनी काही रिप्लाय दिला नाही, असं पांडे म्हणाले.
Sonalee Kulkarni :नाद खुळा! पिवळ्या रंगाच्या साडीत सोनालीचं बीचवर झक्कास फोटोशूट
ते पुढं म्हणाले की, मी फोन करायतो, पण त्यांचा रिप्लाय मिळत नव्हता. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की, मला पैसे द्या अन्यथा मला पत्रकार परिषद घ्यावी लागले. दरम्यान, त्यांनी मला बोलावून पैसे दिले. मात्र, त्यात काही पैसे कमी दिले आहेत, असा दावा पांडे यांनी केला.
पांडे पुढे म्हणाले की, मी शिवसेनेचा सात वर्ष शहरप्रमुख आणि सात वर्ष जिल्हाप्रमुख होतो. उपमहापौर आणि महापौरही होतो. मात्र शिवसेनाप्रमुख किंवा उद्धव ठाकरे यांनी कधीही माझ्याकडून पदासाठी पैसे मागितले नाही. पण नीलम ताईंनी माझ्याकडून पैसे घेतले. आता राज्यभरातून असे अनेक कार्यकर्ते पुढे येतील, असं पांडे म्हणाले.
मराठी साहित्य संमेलनात त्यांनी जो विषय मांडला, तो मांडण्याचं व्यासपीठ ते नव्हतं. तिथं मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला हवाी होती. पैसे घेतल्याशिवाय, ही बाई कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नव्हती. मला ४३ वर्ष झाली, मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी कायम खुले होते. ज्या ज्या ठिकाणी नीलम गोऱ्हे संपर्क प्रमुख होत्या, तिथल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं नाही, असं पांडे म्हणाले.
दरम्यान, विनायक पांडे यांनी केलेल्या आरोपांना आता नीलम गोऱ्हे काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.