Devendra Fadanvis On Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकराची आज वर्षपूर्ती आहे. त्याआधी काल (दि. 29) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले आहेत. त्यानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चांना सुरूवात झाली असून, आता फडणवीसांना विस्तार नेमक्या कोणत्या महिन्यात होणार यावर भाष्य केले आहे. तसेच कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार यावर थेट स्पष्टीकरण दिले आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, राज्याचे अनेक प्रश्न असतात या संदर्भात पाठपुरावा घ्यावा लागतो. अनेक वेळा त्या संदर्भातला बैठकादेखील असतात त्यासाठी हा दौरा होता. त्यानंतर त्यांनी रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य केले. ते म्हणाले की, एवढं स्पेसिफिक सांगत नाही पण मी सांगतोय, मंत्रिमंडळ विस्तार आता जुलै महिन्यात करू असे त्यांनी सांगितले. आम्हाला विस्तार करायचा असून, मुख्यमंत्री त्यावर योग्यवेळी निर्णय घेतील असेही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केले.
कोणता विस्तार आधी होणार?
यावेळी केंद्राचा विस्तार आधी होणार की राज्यातील विस्तार आधी होणार असे विचारले असता ते म्हणाले की, केंद्राचा आणि राज्याच्या विस्ताराचा काहीही संबंध नाही. केंद्राचा विस्तार कधी होणार याबाबत काही माहिती नाही. तसेच आम्हाला राज्याच्या विस्तारात अधिक स्वारस्य आहे.
Supriya Sule : फडणवीस अजूनही पहाटेच्या शपथविधीमध्येच अडकलेत; सुप्रिया सुळेंची मिश्कील टीका
कुणाला मिळणार डच्चू?
आगामी काळात होणाऱ्या विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्याला बातमी मिळाली नाही तो एखादी बातमी तयार करतो आणि सोडतो. अशा बातम्यांना कोणतीही विश्वासार्हता नाही असे म्हणत विस्तार कधीपर्यंत होईल यावर एवढं स्पेसिफिक कुणी सांगत नाही पण मी सांगतोय, मंत्रिमंडळ विस्तार आता जुलै होईल असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
मेळावा रद्द झाला पण पवारांचं ‘नगर’वर लक्ष कायम; विखे-शिंदेंना शह देण्यासाठी रविवारी मैदानात
शिंदेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद येणार
दरम्यान, रखडलेला विस्ताराच्या हालचालींना एकीकडे वेग आलेला असताना हा विस्तार आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या विस्तारात शिंदेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे सांगितले जात असून, आता शिंदेंच्या गोटातून नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.