मेळावा रद्द झाला पण पवारांचं ‘नगर’वर लक्ष कायम; विखे-शिंदेंना शह देण्यासाठी रविवारी मैदानात

मेळावा रद्द झाला पण पवारांचं ‘नगर’वर लक्ष कायम;  विखे-शिंदेंना शह देण्यासाठी रविवारी मैदानात

Sharad Pawar in Ahmednagar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्या अनुषंगाने पक्षांच्या बड्या नेत्यांचे विविध जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू आहेत. त्यामध्ये आता रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) हे अहमदनगरमध्ये येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील प्रमुख नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिक्षक नेते माधवराव पाटील, राजाराम वरुटे, बाळासाहेब काळे उपस्थित राहणार आहे. ( Sharad Pawar will come in Ahmednagar on Sunday with NCP Leaders )

Devendra Fadanvis : एवढं स्पेसिफिक सांगत नाही… पण मी सांगतोय… मंत्रिमंडळ विस्तार आता….

रविवारी (ता. २) सकाळी दहा वाजता अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय महामंडळाचे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. पवारांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील दहा हजार शिक्षक येणार आहेत. अशी माहिती राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे यांनी दिली.

Mumbai Girl Molestation in Local : धावत्या लोकलमध्ये तरुणाचे अश्लिल चाळे, आरडाओरडा होताच ठोकली धूम…

अधिवेशनात या विषयांवर होणार चर्चा :
राज्यभरातून दहा हजार प्राथमिक शिक्षक कार्यकर्ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करणे, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदोन्नती तातडीने करणे, वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर करणे, सेवानिवृत्तीच्या थकीत रकमेसाठी निधी उपलब्ध करून देणे आदी १७ मागण्यांबाबत या अधिवेशनात चर्चा करून ठराव घेतले जाणार आहेत.

पवार काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष :
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा नगरमध्ये साजरा होणार होता. यासाठी राष्ट्रवादीचे मोठं मोठे नेते नगरमध्ये दाखल होणार होते. मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे व पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे बडे नेते नगरमध्ये येणार आहे. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय बोलणार याकडे नगर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube