Mumbai Girl Molestation in Local : धावत्या लोकलमध्ये तरुणाचे अश्लिल चाळे, आरडाओरडा होताच ठोकली धूम…

Mumbai Girl Molestation in Local : धावत्या लोकलमध्ये तरुणाचे अश्लिल चाळे, आरडाओरडा होताच ठोकली धूम…

Mumbai Crime : मुंबईत पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ग्रॅंट रोडजवळ धावत्या लोकल रेल्वेमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धावत्या लोकलमध्ये तरुणीला पाहुन अश्लिल चाळे आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यासंदर्भात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Supriya Sule : फडणवीस अजूनही पहाटेच्या शपथविधीमध्येच अडकलेत; सुप्रिया सुळेंची मिश्कील टीका

नेमकं काय घडलं?
24 वर्षीय तरुणी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लोकलने प्रवास करीत होती. ही तरुणी मालाडमधील रहिवासी असून लोकलमध्ये प्रवास करीत असताना एका तरुणाने तिच्याकडे पाहुन अश्लिल चाळे आणि गलिच्छ भाषेत विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर अश्लिल चाळे करणाऱ्या युवकाने धावत्या रेल्वेमधून उडी घेत धूम ठोकलीय.

पसंतीच्या कपाशी बियाण्यांचा बाजार उठला ! हंगामाच्या सुरुवातीलाच बियाण्यांचा तुटवडा; शेतकरी हतबल

काही दिवसांपूर्वीच लोकलमध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. आता पुन्हा एकदा लोकलमध्ये विनयभंगाचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर तरुणीने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानूसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=4kHPPxLzHfE

दरम्यान, या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेण्यात येत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकारानंतर मुंबईत महिलांसाठी लोकल रेल्वेमध्ये पोलिसांची सुरक्षा असावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube