Download App

‘त्या’ एपिसोडवर मी योग्यवेळी पुस्तक लिहिणार; फडणवीसंचा मोठा खुलासा

Devendra Fadanvis On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले आहे. या पुस्तकात त्यांनी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेल्या शपथ विधीबद्दल भाष्य केले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

2019 साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्या अगोदर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली होती. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार होते. या प्रसंगावर शरद पवार यांनी आपल्या या आत्मचरित्रामध्ये भाष्य केले आहे.

घोटाळा करुन सत्तेत आलेले बोलताना घोटाळा करतात; अजित दादांचा एकनाथ शिंदेंना टोला

पहाटेच्या शपथविधीला माझे अजिबात समर्थन नव्हते. तो मोठा धक्का होता. ‘महाविकास आघाडी’चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं, असे त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. यावर आता उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिले आहे.

Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला

शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात काय लिहले ते मला माहित नाही. पण त्या एपिसोडवर मी योग्यवेळी पुस्तक लिहिणारयं, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी तर आपल्या पुस्तकामध्ये या विषयावर भाष्य केले आहे. पण अद्यापपर्यंत अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथ विधीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. अजित पवार हे कायम माध्यमांसमोर मी या विषयावर बोलणार नाही, असे म्हणत असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावर कधी पुस्तक लिहीतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us