Devendra Fadanvis on Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी पत्रकारांनी सोशल मिडीयावरील वादग्रस्त पोस्ट आणि त्याचबरेबर महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांकडून सध्या केली जात असलेली वादग्रस्त वक्तव्ये यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता फडणवीसांनी यावर उत्तर दिलं यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की,’राज्यातील राजकारणातील खालावत चाललेली वक्तव्यांची पातळी रोखायची असेल तर ती जबाबदारी माध्यमांची आहे. सोपी बातमी मिळते ती दिवसभर चालवता येते त्यासाठी माध्यमं संजय राऊतांकडे जातात त्यातून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संजय राऊतांनी सकाळी नऊच बंद केलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीसारखी एकमेकांबद्दल आदर असणारी राजकीय संस्कृती दिसेल.’अशी टीका यावेळी फडणवीसांनी संजय राऊतांवर केली आहे.
>Amit Shah मुंबई दौऱ्यावर; राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे?
पुढे आपल्या पक्षातील लोकांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की आमच्या पक्षातील लोकांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये केली तर त्यांनी समज दिली जाते. माफी मागितली जाते. पण शेवटी संजय राऊतांनी सकाळी नऊच बंद केलं तर महाराष्ट्राच राजकारण पुन्हा स्वच्छ होईल. तर यासाठी 80 टक्के संजय राऊत जबाबदार आहेत.