पुढील एक वर्ष कुठलीही लालसा मनात न बाळगता भारतीय जनता पक्षाला आपल्याला द्यायची आहेत. मोदीजींनी जे नवभारताचे स्वप्न पहिले ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. देशासाठी आणि मोदींजींच्या स्वप्नासाठी आपल्याला समर्पण करायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना तयारी कराची आहे. पुढच्या एक वर्षात कुणालाही काही मिळणार नाही. जे काही मिळेल ते एक वर्षानंतर मिळेल अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज भाजप महाराष्ट्र कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते.
आता पुढच्या एकवर्षात कोणी कुठलीही समिती मागायची नाही, कोणीही मंत्रिपद मागायचे नाही. फडणवीस यांनी असे सांगून मंत्रिपद मागणारांचे पत्ते कट केले आहेत. आता भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची अपेक्षा करू नये असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
मंत्रिपद मागूनये म्हटल्यावर आमदार सोडून सर्वजण हो म्हणत आहेत. असे फडणवीस म्हंटल्यानंतर सभागृहात हशा पिकाला परंतु यानंतर फडणवीस म्हणाले नाराज होऊ नका आपण लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. परंतु आताही वेळ अशी आहे की पार्टीने मला काय दिल हे न सांगता मी पार्टीला काय देणार. ज्याच्यामध्ये हि हिंमत आहे की मी घेणार नाही तर देणार. तो खरा भाजपचा कार्यकर्ता असे यावेळी फडणवीस म्हणाले.
जो घेण्यासाठी आला तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही. असे म्हणत फडणवीसांनी यावेळी मंत्रिपद मागणाऱ्या आमदारांना टोला लगावला.