नागपूर : अतुल सावेजी तुम्ही सहकार मंत्री आहात. पण सहा महिने झाले अजून तुम्ही त्या खात्यात रुळला नाहीत. काही काम आणलं की देवेंद्रजींना विचारलं पाहिजे म्हणतात. पण त्यांच्याकडे सहा खात्यांचा कारभार आहे आणि भार कशासाठी टाकता?
त्यांच्याकडे सहा पालकमंत्रीपद आहेत. ते कर्तृत्ववान आहेत, पण सहा पालकमंत्री नेमल्यास जास्त काम होणार नाही का? अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
शिंदे गटातील मंत्र्यांचा सवतासुभा असतो, त्यांना काही अडचण नाही, पण हे सगळं करत असताना आपल्या राज्यात ही पद्धत नव्हती. प्रत्येक कामासाठी आपल्याकडे जायला लागणं हे बरोबर नाही.
तुमच्या दोघांचे, तर चांगलं चाललं आहे. देवेंद्रजींना विचारलं की, मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात देवेंद्रजींनी म्हटल्यास मी केलं. ही टोलवाटोलवी सुरु आहे.
दादा तुमची मला इतकी कधी कधी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती, तर अशी टोलवाटोलवी केली नसती. कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला केवळ एक दोन साधी विभाग देऊन बाजूला ठेवलंय.
स्वत: महत्वाची सहा सहा विभाग घेतले आणि या पद्धतीचे राजकारण करता? बरोबर अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला, असा टोमणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना लागवला.