Download App

Kasba Chinchwad Election : कसबा पोटनिवडणूक बिनविरोधसाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन…

पुणे : कसबा पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासूनच चांगलीच चर्चेत आहे. या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी जोरदार तयारी देखील केली आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यातच या निवडणुकीला बिनविरोध कसा करता येईल यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

पुण्यातील कोथरूडमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक (Kasba Chinchwad Election) बिनविरोध होण्याचे आवाहन मी राजकीय पक्षांना केले आहे. तसेच आता प्रत्यक्ष चर्चा करण्यात येईल. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठीच प्रयत्न करण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित झाले की नक्की कळेल उमेदवार कोण आहे. आमचे उमेदवार ठरतील, दिल्ली कार्यालयातून यांची घोषणा होईल. असे म्हणत फडणवीसांनी कसबा पिंपरी चिंचवड मधील उमेदवाराचा सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे.

सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना मनःशांतीची गरज असते. तुम्ही इतके तास काम करत असता त्यामुळे तुम्हालाही मन: शांतीची गरज आहे. आपल्या सर्वांनाच मनशांतीची आवश्यकता आहे. त्यामुळेच ती घेण्यासाठी मी देखील आलो होतो. असे म्हणत फडवणीस यांनी श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

Tags

follow us