राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हंटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजितदादा हे भाजपसोबत जाणार अशी चर्चा सबंध राजकीय वर्तुळात होती. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या काळात कुठेही चर्चा करताना दिसले नाहीत. ज्यावेळी एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांसह सुरत व गुवाहाटीला गेले होते, तेव्हा देखील फडणवीसांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Mission #NoPendency !
Office work. Clearing pendencies..
कार्यालयीन कामकाज.. #worklife #govt #files #sign #Mumbai #AapleSarkar #sarkar #people #Maharashtra #sevak pic.twitter.com/g3bst3nD2o— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 18, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून दोन फोटोंसह एक ट्विट केलं आहे. कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सोबत मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग त्यांनी दिला आहे.
Vinod Tawde Committee Report : भाजपचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ अहवालावर तावडेंचं स्पष्टीकरण…
या ट्विटमधील फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिगारा दिसत आहे. त्यातील काही फायलींवर देवेंद्र फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केल्याने अनेकतर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
देवेंद्र फडणसवीस यांच्या या ट्विटवर अनेक लोकांच्या प्रतिक्रया देखील येत आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवली जात असताना अजित पवार यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी अशा ट्विटमुळे त्यावर पुन्हा चर्चा होताना दिसेल.