Devendra Fadnavis On Pune Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देत भाजपने बाजी मारली आहे. या निवडणुकीत भाजपने 119 जागा जिंकल्या आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आम्हाला नागरिकांनी मोठा विजय दिला आहे सर्वांचे आभार. आम्हाला या विजयाचा आनंद आहे तसेच जबाबदारीचा भान देखील आहे. जनतेने विकासावर, पंतप्रधान मोदींच्या व्हिजनवर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे महापौर बनण्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात करणार आहे. मी स्व:ता कामासाठी मैदानात उतरणार आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच पुणेकरांनी अजितदादांना (Ajit Pawar) नाकारलं मी असं म्हणणार नाही. पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं. तर पुण्याचे दादा कोण यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, पुण्याचे दादा फक्त पुण्याची जनता आहे.
तर दुसरीकडे मुंबईत महापौर कोण होणार? यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईत महापौर कोण होणार? किती वर्षांसाठी होणार ? याबाबत मी आणि एकनाथ शिंदे निर्णय घेऊ मात्र दोन्ही पक्ष मिळून मुंबई चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तर महापालिका निवडणुकीत राज्यातील लोकांना मोदींच्या विकासावर विश्वास होता त्यामुळे लोकांनी आम्हाला तसेच आमच्यासोबत असणाऱ्या पक्षांना देखील लोकांनी मत दिलं आणि काँग्रेसला दाखवून दिले की, राज्यात फक्त विकासावर निवडणुका होणार असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने 119 जागा जिंकल्या असून शिवसेना शिंदे गटाला एकही जागा जिंकता आली नसून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 27 तर शिवसेना ठाकरे गटाला 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 3 आणि काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला आहे.
13 महापालिका अन् 114 नगरसेवक ; राज्यात MIM ची जोरदार मुसंडी का?-
एकूण जागा 165
भाजप – 119
शिवसेना – 0
शिवसेना ठाकरे गट -1
राष्ट्रवादी शरद पवार – 3
राष्ट्रवादी अजित पवार – 27
काँग्रेस -15
