Video : ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाणं म्हणत कार्यकर्त्यांनी फोडला विधानसभेचा नारळ

Deva Bhau Song : आगामीकाळात राज्यात विधानसभ निवडणुकांचा (Maharashtra Assembly Election) धुराळा उडणार असून, या निवडणुकांसाठी आकर्षित प्रचार गीत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर एकीकडे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रचारगीत करण्यात व्यस्त झालेले असतानाच दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ म्हणत देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) ब्रॅडिंग करत विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा नारळ […]

Letsupp Image (11)

Letsupp Image (11)

Deva Bhau Song : आगामीकाळात राज्यात विधानसभ निवडणुकांचा (Maharashtra Assembly Election) धुराळा उडणार असून, या निवडणुकांसाठी आकर्षित प्रचार गीत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर एकीकडे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रचारगीत करण्यात व्यस्त झालेले असतानाच दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ म्हणत देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) ब्रॅडिंग करत विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा नारळ फोडला आहे. या गाण्यात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात.

देवा भाऊ गाण्यात नेमकं काय?

एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही योजना जरी महायुतीच्या सरकराने आणलेली असली तरी, याचे श्रेय तिन्ही पक्षातील कार्यकर्ते आपापल्या पक्षालाच देत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून भाजप कार्येकर्त्यांनी माझी लाडकी बहीण योजनेचे श्रेय दाखवण्यासाठी भाजपकडून जाहिरातीच्या मार्फत प्रचार केला जात आहे. त्यासाठी बहिणींचा भाऊ ‘देवा भाऊ’ या गाण्यांमार्फत जाहिरात केली जात आहे.

गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांचे ब्रँडिंग

गाण्याच्या सुरूवातीला फडणवीसांचं लक्ष्य नेमकं काय हे सांगताना या गाण्यात दिवसरात्र, एकच लक्ष्य, एकच ध्यास, देश हाच धर्मप्राण आणि श्वास ज्याचा असे प्रेरणादायी बोल या गाण्यात आहेत. याशिवाय फडणवीसांनी 2014 ते 2019 त्यानंतर 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर काय-काय काम केली यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईतील विस्तारलेल्या मेट्रोसह फडणवीसांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत यावर कटाश टाकण्यात आला आहे.

https://twitter.com/DevaBhau161430/status/1837423431920373804

Exit mobile version