Download App

मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून… : फडणवीसांचा इशारा

शिर्डी : “काही लोक सांगतात की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, पण ती कशा करता? तर त्या खुर्चीच रक्षण करण्याकरता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तरी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम करु”, असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना इशारा दिला. ते शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. (DCM Devendra Fadnavis talk on cm post in Shirdi)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज एक मजबूत सरकार राज्यात आहे. पण काही लोक दिवसा स्वप्न पाहतात आणि मग सांगतात की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. पण ती कशा करता? कर त्या खुर्चीच रक्षण करण्याकरता आहे. त्यामुळे कोणीही आमच्या मुख्यमंत्र्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम हे दोन उपमुख्यमंत्री मिळून करतील.

आमचे मुख्यमंत्री 24 तास काम करतात, एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. एक असा मुख्यमंत्री जो इर्शाळवाडीला दुर्घटना झाल्यानंतर ज्या ठिकाणी प्रशासनही पोचू शकत नाही त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून पायी चालत गेले. त्यामुळे आता आम्ही तिघं एकत्रित आलो आहोत. शिंदे साहेबांची कामाची शैली आणि अजितदादा, माझ्याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आम्ही तिघे एकत्रित आलो. याला म्हणतात एक असं कॉम्बिनेशन “जिसका कोई जवाब नही है” याचा काही जवाब नाही आहे, असंही फडणवीस म्हणाले.

 

Tags

follow us