पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस राजीमाना देणार; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एसआरए घोटाळ्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री

Sanjay Raut On Devendra Fadnavis

Sanjay Raut On Devendra Fadnavis

Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एसआरए घोटाळ्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी जेव्हा पुढचा बॉम्ब टाकेल तेव्हा मुख्यमंत्री राजीनामा देणार असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणात लवकरच मोठा खुलासा होणार असल्याचा इशारा देखील माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एसआरए (SRA) घोटाळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मर्जीतील बिल्डरांना वाचवत असल्याने या प्रकरणाचा तपास होत नाही. पण हे प्रकरण संपलेलं नाही. मी शांत बसणार नाही. मी जेव्हा पुढचा बॉम्ब टाकेल तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले. तर यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था (India Economy) ही सध्या जगातली सगळ्यात डळमळीत अर्थव्यवस्था आहे. जगातील आर्थिक महाशक्ती वगैरे भारत बनत असल्याच्या ज्या काही वल्गना नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांचे लोक करतायत हा खोटारडेपणा आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत डळमळीत आहे. राज्यात गंभीर दुष्काळ असून या दुष्काळ निवारणासाठी 40 हजार कोटींची गरज आहे आणि हे 40 हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे नाही, मग हे करतायत काय? राज्य सरकारने दुष्काळासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे मात्र केंद्राने अद्याप मदक केली नाही. या उलट मुंबईतल्या एसआरए घोटाळा जो सध्या सुरु आहे.

Satara District Bank Election : साताऱ्यात भाजपला धक्का ; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर

300 प्रकल्प जे आङेत जे एसआरएमध्ये बसत नाहीत, तरीही मुख्यमंत्र्यांच्या मर्जीमधल्या बिल्डरांसाठी जिथे झोपड्या नाहीत अशा जमिनीसुद्धा एसआरए प्रकल्पामध्ये घेऊन मुंबईच्या आणि राज्याच्या महसुलाचं जवळजवळ 40 हजार कोटींचं नुकसान केलं आहे. म्हणजेच अर्थव्यवस्था जरी डळमळीत झाली असली तरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच फडणवीसांच्या मर्जीमधले बिल्डर आणि उद्योगपती प्रचंड पैसा महाराष्ट्र आणइ देश लुटून कमावतायत असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version