Download App

आमच्याकडे कुणीही CM होऊ शकतो; फडणवीसांनी स्वतःचं केला ‘सेल्फ’ गोल

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये चर्चेत नसलेल्या चेहऱ्यांना भाजपनं मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपच्या या घोषणेनंतर या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेल्या प्रस्थिपितांना मोठा धक्का बसला. आता हाच कित्ता भाजप येत्या काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये राबवणार का? असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जाऊ लागला आहे. त्यातच खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (दि.20) विधान परिषदेत भाषणादरम्यान सर्वांना अच्छे दिन येणार म्हणत सूचक विधान करत आमच्याकडे कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो, असे म्हणत स्वतःच्या मानातील धाकधूक बोलून दाखवली आहे. तर, दुसरीकडे मात्र, प्रविण दरेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पोपट दे अन् घटस्फोट घे; पतीचा पत्नीत नाहीतर पोपटात जीव, नेमका विषय काय?

सभागृहात नेमकं काय घडलं?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीसांनी सविस्तर भाषणावेळी भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी विदर्भाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आभार मानले. हा मुद्दा विरोधकांकडून येईल असे वाटत होते. पण तो आला नाही असे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांनी दरेकरांचे अभिनंदन करताच समोरील विरोधी पक्षातील काही जणांनी आता त्यांना मंत्री करा असा टोला मारला.

फडणवीसांच्या विधानानं दरेकरांच्या आशा पल्लवित

विरोधीपक्षातील आमदारांनी केलेल्या मागणीवर फडणवीसांनी लगेच प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, “आमच्या पक्षात मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो” आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची. हरएक के अच्छे दिन आएंगे हे लक्षात ठेवा असा टोला लगावला.

पोपट दे अन् घटस्फोट घे; पतीचा पत्नीत नाहीतर पोपटात जीव, नेमका विषय काय?

फडणवीसांचं विधान अन् सिनियर नेत्यांचे वाढलं टेन्शन

एकीकडे सगळ्यांनी आशा ठेवा म्हणत हरएक के अच्छे दिन आएंगे म्हणणाऱ्या फडणवीसांच्या विधानाने अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या असतानाच फडणवीसांच्या मागे बसलेल्या गिरीश महाजनांनी “सीनिअर लोकांनीही आशा ठेवावी का?” असा प्रश्न विचारला. त्यावर मात्र, आपण सीनिअर लोकांचा स्कोप थोडा कमी केलाय” असे उत्तर दिले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांनंतर मोठ्या पदाचा विचार करणाऱ्या महाजनांसह अनेक नेत्यांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे फडणवीसांनाच्या मानातही भाजपच्या नव्या प्लॅनिंगमुळे धाकधूक असल्याचे दिसू लागले आहे.

follow us