Download App

शेतकरी सुखी राहू दे; मुख्यमंत्री शिंदेंचं विठूरायाला साकडं, नाशिकच्या अहिरे दाम्पत्याला पुजेचा मान

आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेत.

  • Written By: Last Updated:

Ashadhi Ekadashi : आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, माझा शेतकरी सुखी-समाधानी राहो दे, राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, असं साकडं आपण विठ्ठल चरणी घातलं. (Pandharpur) दरम्यान, यावेळी मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व त्यांच्या पत्नी आशा बाळू अहिरे या वारकरी दांपत्याला मान मिळाला. (Ashadhi Ekadashi) आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

मोठी गर्दी  विशाळगड मशीद तोडफोड प्रकरण; शाहू महाराजांनी वारसा जपला, नागरिकांची विचारपूस

पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. दरम्यान, मध्यरात्रीपासूनच चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. पुजा झाल्यानंतर शिंदे म्हणाले, आपण राज्यात भरपूर पाऊस पडू दे, राज्यातील शेतकरी सुखी-समाधानी राहू दे असं आपण विठ्ठलाला साकडं घातल आहे. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अहिरे दाम्पत्य IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी घडामोड; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाची तक्रार

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शासकीय महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे ( वय 55 ) आणि सौ आशाबाई बाळू अहिरे ( वय 50 ) या दाम्पत्याला मिळाला. गेली सोळा वर्षे हे दाम्पत्य पंढरीची वारी करत आहेत. अहिरे दांपत्य हे सटाणा तालुक्यातील अंबासन इथले वारकरी आहेत. त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकऱ्यांना महामंडळाच्या वतीनं वर्षभरासाठीचा मोफत पास यावेळी देण्यात आला.

follow us