IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी घडामोड; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाची तक्रार
Pooja Khedkar harassment Complaint against pune collector Suhas Divse : वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या प्रकरणामध्ये एका मागे एक अपडेट समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. ती म्हणजे पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Divse) यांच्या विरोधात वाशिम पोलिसांमध्ये छळाची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार पोलिसांकडून सध्या चौकशीमध्ये ठेवण्यात आली आहे.
शिंदे, फडणवीस अन् दादांसाठी धोक्याची घंटा… ‘मविआ’ विधानसभेलाही देणार दणका?
दरम्यान पुण्याहून वाशिम येथे बदली झालेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी सोमवारी रात्री उशिरा वाशिमच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या गटासोबत तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा केली होती. मात्र ही चर्चा कशाबाबत केली होती? याचा कोणताही खुलासा त्यांनी केला नव्हता. तर तक्रारीनंतर ती बंद दाराची चर्चा या तक्रारी संदर्भातच असल्याचे स्पष्ट झालं आहे.
IAS पूजा खेडकर यांच्यावर पहिली मोठी कारवाई…
दुसरीकडे खेडकर यांच्यावर मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांचा पुढील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम थांबविण्यात आला असून त्यांना अकादमीमध्ये परत बोलावून घेतले आहे. यानंतर राज्य शासनानेही त्यांची तात्काळ जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्तता केली आहे.
जय हरी विठ्ठल ! कडक मराठीवर आषाढी वारी विशेष भाग बघा
पूजा खेडकर या सध्या वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाचा पुढचा टप्पा अकोला येथे पार पडणार होता. 15 जुलैपर्यंत त्यांना अकोला येथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. इथे 19 जुलैपर्यंत आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत त्यांचे प्रशिक्षण चालणार होते. पण आता खेडकर यांचा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमच थांबविण्यात आला आहे. आता खेडकर यांना 23 जुलैपर्यंत मसुरीमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.