शिंदे, फडणवीस अन् दादांसाठी धोक्याची घंटा… ‘मविआ’ विधानसभेलाही देणार दणका?

शिंदे, फडणवीस अन् दादांसाठी धोक्याची घंटा… ‘मविआ’ विधानसभेलाही देणार दणका?

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) महायुतीने (Mahayuti) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) जोरदार कंबर कसली आहे. मतदारांची मानसिकता बदलण्यासाठी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. यात महिलांसाठीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरेल अशी सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय सरकारने सोयाबिन आणि कापूस अनुदानाचाही निर्णय या आधिवेशनात मार्गी लावला. तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची फी माफी करण्यात आली आहे. या सगळ्या योजनांचा सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत फायदा मिळेल अशी अपेक्षा सत्ताधारी नेत्यांना आहे. (Out of 288 seats, the Mahavikas Aghadi is expected to get 152 seats and the Mahayuti 136 seats in the upcoming assembly elections.)

दुसऱ्या बाजूला आरक्षण मुद्दा पुन्हा डोके वर काढत आहे. मराठा आणि ओबीसी असे दोन्ही गट आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक दिसतात. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात या आंदोलनाचा फटका बसल्याने यावरही उपाय शोधण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावर सरकारसोबत एकत्र यावे, चर्चा करावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेत्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार राजकीय घडामोडींकडे कसे बघत आहेत, याचा कल समजून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समुहाने केला आहे. यात विधानसभा निवडणुकीत कोणाचे सरकार येऊ शकते, मुख्यमंत्री म्हणून कोणत्या चेहऱ्याला पसंती आहे, याचा अंदाज या सर्वेक्षणामधून घेण्यात आला आहे.

पाहुयात नेमका हा सर्व्हे काय सांगतो आणि कोणत्या पक्षाला सत्ता मिळू शकते…

सकाळने केलेल्या सर्वेक्षणात आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा कल समजून घेण्यासाठी दोन स्वतंत्र प्रश्न विचारण्यात आले होते. मविआ की महायुती या प्रश्नावर उत्तर देताना अधिक मतदार मविआला पसंती देताना दिसतात. तर सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर पक्षनिहाय मिळालेल्या प्राधान्यात भाजप क्रमांक एकवर आहे. मात्र बहुमतापासून दूर आहे अशे दिसते. आकडेवारीत बघायचे तर एकूण 288 पैकी महाविकास आघाडीला 152 आणि महायुतीला 136 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

ट्रेनिंग होल्ड करुन परत बोलावले : IAS पूजा खेडकर यांच्यावर पहिली मोठी कारवाई

टक्केवारीमध्ये सर्वेक्षणातील 48.7 टक्के मतदारांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तर 33.1 टक्के मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने आहे. पक्षांमध्ये सर्वाधिक पसंती भाजपला मिळाली आहे. भाजपला 28.5 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. त्याखालोखाल काँग्रेस 24 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 14 टक्के, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 11.7 टक्के, शिवसेना सहा टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4.2 टक्के असा पाठिंबा मतदार नोंदवत आहेत.

SC, ST ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा , प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचाही अंदाज या सर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. यानुसार भाजपच्या जागा घटताना दिसून येत आहेत. भाजपला 95 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला अवघ्या 27 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 18 जागा मिळू शकतात असे अंदाज वर्तविण्यात आला आहे. थोडक्यात महायुतीमध्ये सर्वात जास्त फटका अजितदादांना बसू शकतो.

इकडे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. काँग्रेसला 67 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 41 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 31 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय 9 जागा अन्य पक्षांना मिळू शकतात. म्हणजेच मतदारांचा हा कल मतदानापर्यंत कायम राहिला तर लोकसभेचा ट्रेंड विधानसभेलाही कायम राहू शकतो, असेच म्हणायला हवे. मात्र असाच कल राहील असेही म्हणता येत नाही. त्यामुळे नेमके काय होईल हे आपल्याला प्रत्यक्ष निकालातूनच कळून येऊ शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube