SC, ST ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा , प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

SC, ST ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा , प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठी घोषणा केली आहे. SC, ST ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच आरक्षणाबाबत प्रश्न सोडवण्यासाठी सरकार गंभीर आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला. ओबीसींचा लढा ओबीसी संघटनेंनी लढा असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले.

25 जुलैपासून या यात्रेची सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या यात्रेची सांगता 7 किंवा 8 ऑगस्टला होणार असून ओबीसी आरक्षण बचाव ही प्रमुख मागणी या यात्रेची असणार आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 25 जुलैरोजी दादर चैत्यभूमी इथून SC, ST ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात होणार आहे.

यानंतर ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाणार आहे आणि 7 किंवा 8 ऑगस्टला तारखेला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे सांगता होणार आहे. असं  या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Pooja Khedkar : ‘जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी…’, IAS पूजा खेडकरांनी स्पष्टच सांगतिले

महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. त्यामुळे आता काय स्वरूप होईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि नेत्यांना होत आहे.

जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरु केली आहे तर दुसऱ्या बाजूला या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये एनसीपी, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे सर्व मराठे नेते उपस्थित नव्हते.

त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय? असा प्रश्न वंचितकडून विचारण्यात आला होता. जो पर्यंत राजकीय पक्ष भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत तोडगा निघणार नाही असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube