BBC IT Raids : लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर.., उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर आघात करण्याचं काम सुरु असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयात आयकर विभागाने छापा मारला आहे. हा छापा बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची डॉक्यमेंटरी प्रकाशित केल्यानेच केंद्र सरकारकडून हा छापा मारण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्याता आला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या […]

Untitled Design (17)

Untitled Design (17)

मुंबई : लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर आघात करण्याचं काम सुरु असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयात आयकर विभागाने छापा मारला आहे. हा छापा बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची डॉक्यमेंटरी प्रकाशित केल्यानेच केंद्र सरकारकडून हा छापा मारण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्याता आला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले असल्याचं दिसून येत आहे.

ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभागाने छापा मारला आहे. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांवर अशा धाड कोणत्या लोकशाहीत बसते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच कोणी यांच्याविरोधात आवाज उठविला तर आम्ही चिरडून टाकू, अशी पद्धत या सरकारकडून सुरु असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

Supriya Sule : ‘फडणवीस फेल झाल्याने ते पवारांचे नाव घेत आहेत’

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढाई होती, आत्ताची लढाई स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सुरु आहे. बीबीसी कार्यालयावर पडलेली धाड ही पाशवी वृत्तीतून आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. आम्ही काहीही करू तुम्ही अडवाल तर चिरडून टाकू, ही पाशवी वृत्ती असून या विरोधात आपण सर्वांनी एक झालं पाहिजे, असं आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray : बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं?

दरम्यान, आज आयकर विभागाकडून बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर छापे टाकण्यात आले. एकीकडे बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटाचा वाद सुरु असतानाच आयकर विभागाने केलेल्या या कारवाईवरून देशभरातील विरोधकांकडून टीका होत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Exit mobile version