Dhananjay Deshmukh On SIT Meeting : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्यात राजकारण तापलं असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी एसआयटीच्या (SIT) भेटीनंतर उद्या होणाऱ्या आंदोलनाला स्थगिती दिल्याची माहिती दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Valmik Karad) मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज पाण्याच्या टाकीवर चढून सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांनी सीआयडी (CID) आणि एसआयटी पथकाची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, आम्हाला हवी असलेली माहिती मिळाली नाही. आजच्या बैठकीत एसआयटीचे अध्यक्ष बसवराज तेली (Basavaraj Teli) नव्हते, ते उद्या येणार आहेत. तपास योग्य दिशेनं सुरु असल्याची माहिती आम्हाला अधिकाऱ्यांनी दिली.
आजच्या बैठकीत आमची वीस ते पंचवीस मिनीट अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. सर्व तेच ते मुद्दे आहेत. तेली साहेब आज बाहेर आहेत, त्यामुळे ते उद्या भेटीला येणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी दिली.
माध्यमांशी पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, या बैठकीत आम्ही लेखी स्वरुपात काय काय हवं आहे, ते अधिकाऱ्यांना दिले आहे. उद्याचे आंदोलन मागे घेतले आहे. जी काय चर्चा झाली त्यावर समाधान व्यक्त करता येणार नाही. मात्र आमचा विश्वास यंत्राणांवर आहे. तेली साहेबांना उद्या भेटणार आहे. त्यामुळे उद्याचं आंदोलन स्थगित करण्यात केलं आहे. आंदोलनाबाबत या भेटीनंतर निर्णय घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.
तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास करणाऱ्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आल्यानंतर आता नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
UGC NET Postponed: 15 जानेवारीला होणारी UGC- NET परीक्षा रद्द, ‘हे’ आहे कारण
या एसआयटीचे अध्यक्ष बसवराज तेली हेच असणार आहे. नव्या एसआयटीमध्ये अनिल गुजर. विजयसिंग जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज राजेंद्र वाघ,चंद्रकांत एस काळकुटे, बाळासाहेब देविदास अहंकारे, संतोष भगवानराव गित्ते या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.