Pankaja Munde On Dhananjay Munde Vipassana : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गेल्या आठ दिवसांपासून मन:शांतीच्या शोधात इगतपुरी (Igatpuri) येथील विपश्यना केंद्रात दाखल झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्याकडे असलेले खाते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे इगतपुरीत दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता याबाबत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांनी चांगला मार्ग निवडला वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे आज पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.
मागील आठ दिवसांपासून धनंजय मुंडे नाशिकच्या इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रामध्ये दाखल झाले आहेत असं माध्यमांनी पंकजा मुंडे यांना विचारला असता धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला असून आता मनशांती मिळेल. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. तर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात देखील प्रतिक्रिया दिली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात न्याय मिळणार
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, वैष्णवी हगवणेच्या आई वडिलांच्या घरी मी भेट दिली. तिच्यावर जी वेळ आली ती कोणत्याच मुलीवर येऊ नये अशी माझी इच्छा आहे. तिला न्याय मिळालाच पाहिजे, तिला न्याय मिळवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या प्रत्येक पावलामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ती चौकशी कोणाकडे द्यावी याचा सर्व निर्णय गृहमंत्रालय योग्य विचारांती घेणारच आहे. पण तिला न्याय मिळेल याबाबत कोणताही संदेह आमच्या मनामध्ये नाही. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
तसेच महिला आयोगावर देखील त्यांनी प्रतिक्रिया देत एखादी महिला जेव्हा तक्रार करते तेव्हा दखल घेणे हे कायद्याने क्रमप्राप्त आहे, त्यात अनेकदा खोटी तक्रार देखील असते पण दखल घेणे हे कायद्याने क्रमप्राप्त आहे. याचं केंद्र हे पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनला कोणी तक्रार केली तर त्याची दखल घेणे हे क्रमप्राप्त आहे. महिला आयोगात ज्या सुनावणी असतात त्यामध्ये वेळ देण्याची सूचना आम्ही त्यांना करू अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी दिली.