Dhananjay Munde Inquiry on illigle Agri department tender : बीड जिल्ह्यातील मास्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा तसेच अडचणींचा सिलसिला कायम आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचे आरोप झाल्यानंतर त्यांना अगोदर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता त्यांची चौकशी देखील होणार असल्याचं वृत्त आहे. काय आहे हे प्रकरण पाहुयात?
अवकाळीचं संकट कायम! वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले. त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाचे अनेक गैरव्यवहार समोर आणण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणांमध्ये आता 16 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता धनंजय मुंडे यांची लोकायुक्तांसमोर चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी राज्याचे मुख्य सचिव कृषी आणि पदम विभागाचे प्रधान सचिव, पोलीस महासंचालक यांना देखील बोलाण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी ठरतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान देशमुख हत्या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे नाव आलं. त्यावेळी धनंजय मुंडेंवर देखील आरोप प्रत्यारोप सुरू झाले. तर याचवेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करून कृषी विभागात मोठा घोटाळा केला. गैर प्रकार करत निविदा काढल्या गेल्या. तसेच मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्ये कृषी केंद्र चालकांकडून देखील शेतकऱ्यांची बोगस कृषी निविष्ठा देत फसवणूक करण्यात आल्याचे आरोप दमानिया यांनी केले होते. त्यामुळे आता या प्रकरणात मुंडे यांच्या बाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता..”, PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा