मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संंतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची र्चा होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीला दाखल होताना स्वतः धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) याबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजीनामा दिल्याचे विचारले असता मी कोणताही राजीनामा दिलेला नसल्याचा खुलासा खुद्द धनंजय मुंडेंनी केला आहे. (Dhananjay Munde On Resignation )
मनोज जरांगे, आमदार सुरेश धस अन् संदीप क्षीरसागरांवर गुन्हा दाखल, ओबीसींचं ठिय्या आंदोलन
आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपविल्याची चर्चा होती. मात्र असा कोणताही राजीनामा दिलेला नसल्याचे स्वतः धनंजय मुंडेंनी सांगितले आहे.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडमुळेच पंकजा मु्डेंचा लोकसभेला पराभव, सुरेस धसांचा गौप्यस्फोट
योग्यवेळेना उत्तर देणार
यावेळी धनंजय मुंडेना भाजप आमदार सुरेश धस वेळोवेळी तुमच्यावर टोकाचे आरोप करत आहेत. त्यावर त्यांना काही प्रत्युत्तर देणार का? त्यावर योग्यवेळेला एवढ्या मोजक्या आणि सूचक शब्दात धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. त्यामुळे आता धनंजय मुंडे सुरेश धस यांना कोणत्या शब्दात आणि कधी प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे सगळं मीडिया ट्रायल सुरूये
काल (दि.6) धनंजय मुंडे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंनी हे सगळं मीडिया ट्रायल सुरू असल्याचे सांगितले होते. तसेच मी माझ्या विभागातील कामांसंदर्भात अजित पवार यांची भेट घेतल्याचे सांगत इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नसल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले होते. तसेच संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्यामुळे मी त्यावर बोलणं योग्य नसल्याचे मुंडे म्हणाले होते.
धनंजय मुंडे जातीयवादी, लोकांना मारण्यासाठी टोळ्या पाळतात, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
संतोष देखमुखांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आणि इतर बाबींवर देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंब त्यांची बाजूही मांडणार आहेत. या भेटीसाठी भाजप आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेतला आहे.