Download App

धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी, सरपंचाने थेट गाडीच पेटवली

Dhangar Community धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यातील एका सरपंचाने त्यांची चारचाकी गाडी पेटवून दिली आहे.

  • Written By: Last Updated:

Dhangar Community Demands for Reservation from ST Sarpanch burnt Car in Jalana : राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर राज्य सरकारने काढला. त्यानंतर त्याला राज्यभरातून ओबीसी समाजातून विरोध होत आहे. याच दरम्यान आता ओबीसीमधील अनेक समाज घटक हे स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरले आहेत.

राज्यातील दीड कोटी एकर शेतीचे नुकसान; सरसकट कर्जमाफी देणार का ? कृषिमंत्र्यांचे थेट उत्तर

यामध्ये एकीकडे बंजारा समाजाचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे धनगर समाजाकडून देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी केली जात आहे. यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यातील एका सरपंचाने त्यांची चारचाकी गाडी पेटवून दिली आहे. गोविंद जाधव असं या गाडी पेटवणाऱ्या सरपंचांच नाव आहे.

द राजा साबचा ट्रेलर लॉन्च! प्रभासचा भूतांशी सामना तर संजय दत्तच्या लूकने प्रेक्षकांना भुरळ

ते जालन्यातील लोणार भायगाव गावचे सरपंच आहेत. धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ जाधव यांनी स्वतःची मारुती स्विफ्ट गाडी पेटवली आहे. जाधव यांनी गाडीवर पेट्रोल टाकून ही गाडी पेटवून दिली. दरम्यान दोन दिवसांत जर धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही. तर आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच जाधव यांनी दिला आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंवर हल्ला

अहिल्यानगर तालुक्यात खडकी येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

WhatsApp ला पिछाडत नंबर 1 बनलं Arattai, जाणून घ्या ‘अरत्ताई’ शब्दाचा नेमका अर्थ!

अहिल्यानगर जवळ असलेल्या अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर नाश्ता करून पुढे जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी वाहनावर हल्ला केला. (ता. २७) पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते. दुपारी ती सभा होती. हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

follow us