Download App

Dharashiv : संभाजीनगरनंतर धाराशिवमध्येही MIM आक्रमक, नामांतरावरून वाद पेटणार?

  • Written By: Last Updated:

गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरावरून वाद पेटला असताना आता धाराशिवमध्येही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर केल्याच्या निषेधार्थ एमआयएमने 8 मार्चपासून धाराशिव येथे साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नंतर धाराशिव येथे MIM आमरण उपोषण करणार असल्याने नामांतरला पाठिंबा देणाऱ्या व विरोध करणाऱ्या संघटनांमध्ये वाद पेटणार आहे. संभाजीनगरमध्ये खासदार जलील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरु आहे. त्यावरून जोरदार राजकारण पेटलेले पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : ‘मिंधे सरकारच्या गद्दारीची’ अंबादास दानवेंनी पेटवली होळी

सत्तेच्या बळावर नामांतर

सरकारकडून सत्तेच्या बळावर, नागरिकांना विश्वासात न घेता नामांतर केल्याचा आरोप MIMने केला आहे. MIM कडून यासंदर्भांत एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “उस्मानाबाद जिल्हा ऐतिहासिक जिल्हा असून या जिल्ह्याचे नाव धाराशिव ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते मात्र हरकती न मागविता न्यायालयीन प्रकरण असताना केवळ सत्तेच्या बळावर नामांतर केले आहे”

निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, “न्यायालयीन प्रकरण चालु असताना केवळ सत्ता हाती असल्यामुळे या नामांतरास मंजुरी दिल्यानंतर नागरीकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. या नामांतराच्या मंजुरीस नागरिक म्हणून आम्ही एमआयएम पक्षाच्या वतीने विरोध दर्शवित आहोत.”

उपोषण करण्याचा इशारा

उस्मानाबादच्या नामांतरास विरोध असून नामांतर करण्यात येवू नये या मागणीसाठी एआयएमआयएमच्या वतीने 8 मार्च रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून न्याय मागणार आहोत, असा इशारा एमआयएम पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मोठे राजकीय वातावरण तापले आहे.

Tags

follow us