Radhakrishna Vikhe On Sangram Jagtap : धीरज परदेशी हत्या प्रकरणामध्ये पोलीस योग्य ती कारवाई करत आहे यामुळे कोणी संशय घेण्याचे काही कारण नाही धीरजबाबत घडलेला प्रकार योग्य नाही या प्रकरणातील बहुतांश आरोपींना पोलिसांनी अटक केलेले असून कारवाई देखील सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेला आपण काम करू दिले पाहिजे अशा शब्दात एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाम उल्लेख टाळत त्यांचे शाब्दिक कान टोचले
यावेळी बोलताना मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) म्हणाले, अवैध धंद्यांना रोख लावण्यात येत आहे. तसेच आमले पदार्थांवर देखील जोरदार कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून योग्यरित्या कारवाई केली जात नसल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला होता. यावरती बोलताना विखे म्हणाले की, याबाबत मी जगतापाशी चर्चा करणार आहे. पोलिसांचे मनोबल वाढवण्याचे काम लोकप्रतिनिधींनीच केले पाहिजे तसेच या धीरज परदेशी प्रकरणानंतर जे काही आरोप होत आहेत मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत बहुतांश आरोपींना अटक केली आहे. आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे. नेमकं जगताप यांचा पोलीस यंत्रणेच्या चौकशी वरती संशय आहे का? तपासमध्ये काही अडचणी वाटत आहेत का? तसेच पोलीस चौकशीमध्ये काही त्रुटी आहे का? याबाबत आमदार जगताप पणशी चर्चा करणार असल्याचे मंत्री विखे म्हणाले.
जिल्हा बँक निवडणूक, विखे-थोरातांची सहमती एक्स्पेस, राम शिंदेंचे स्थान काय?
जरांगे पाटलांचा गैरसमज झाला असेल त्यांच्याशी भेटून चर्चा करणार
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मंत्री विखे म्हणाले जरांगे यांनी बावनकुळे यांच्या बाबत आक्षेप घेतला होता. जात पडताळणी करण्याच्या अधिकार हे समितीला आहे. त्यांना समितीला मुख्यमंत्री असतील किंवा बावनकुळे असतील हे कोणीही निर्देश देऊ शकत नाही त्यामुळे जरांगे पाटलांचा गैरसमज झाला असेल त्यांच्याशी भेटून चर्चा करणार आहे जरांगे यांचा ज्या मुद्द्यांवर आक्षेप आहे त्यांच्याशी चर्चा करून यामध्ये मार्ग काढला जाईल असे मंत्री विखे म्हणाले.
