Chandwad Court : शनिवारी 5 एप्रिल रोजी चांदवडच्या न्यायालयाबाहेर अजब घटना घडली ज्याची चर्चा सध्या संपूर्ण नाशिक (Nashik) जिल्ह्यात होताना दिसत आहे. माहितीनुसार, खावटी देण्याच्या वादा वरून शनिवारी चांदवडच्या न्यायालयाबाहेर (Chandwad Court) ननंद भावजईत जोरदार भांडण झाले आणि त्यानंतर तुंबळ हाणामारी झाली.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या विकास केसे आणि चांदवडच्या ग्रामीण भागातील माधुरीचे दोन वर्षा पूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिने चांगले गेले त्यानंतर वाद होऊ लागल्यामुळे माधुरी माहेरी निघून आली आणि तीने कोर्टात खावटीसाठी दावा दाखल केला. चांदवड न्यालयात सध्या केस सुरु असून मात्र आतापर्यंत घटस्फोट झाला नसताना देखील माधुरीने दुसरे लग्न केले असा आरोप विकासची बहिणीने केला आहे. याबाबत पुरावे घेऊन आल्याने माधुरीचे बिंग फुटणार या भीतीने माधुरी आणि तीच्या दुसऱ्या पतीने मारहाण केल्याचा आरोप देखील माध्यमांशी बोलताना विकासची बहीण आणि वडिलांनी केला.
‘…दोषींवर कठोर कारवाई होणार’, बारामतीत घडलेल्या घटनेवरून अजित पवारांनी भरला सज्जड दम
तर दुसरीकडे हाणामारी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवला. मात्र त्यानंतर माधुरी निघून गेली त्यामुळे या प्रकरणात तिची प्रतिक्रिया कळू शकली नाही. मात्र विकासच्या नातेवाईकांनी माधुरी सोबत झालेले पहिले आणि दुसरे लग्नाचे फोटो दाखवीत तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.