बीडच्या कोट्यवधींच्या भूसंपादन घोटाळ्यात मोठी कारवाई; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Untitled Design 86

Untitled Design 86

 Avinash Pathak was arrested from Latur : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा वाटप प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून या कथित कोट्यवधींच्या महसूल घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एसआयटीने लातूर येथे दिवसभर चौकशी केल्यानंतर अविनाश पाठक यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. पुरावे आणि चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांच्या मावेजा वाटपात आणि जमीन अधिग्रहणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याची चर्चा असून, यापूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आरोपींमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या देखील नावाचा समावेश होता.

भाजपने फसवून 100 जागा लुटल्या, मला काढा, राजीनामा देणार नाही; ममतांनी बैठकीत काय-काय म्हटलं?

पहिले या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक पूजा पवार या करत होत्या. मात्र, त्या रजेवर गेल्यानंतर तपासाची जबाबदारी एम. व्यंकटराम यांच्याकडे सोपवण्यात आली. एसआयटीने विविध कागदपत्रांची पडताळणी, आर्थिक व्यवहारांचा मागोवा आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानांतर अखेर ही मोठी कारवाई केली आहे.

अटक करण्यात आल्यानंतर अविनाश पाठक यांना लवकरच बीड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हाधिकारी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक झाल्याने राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एसआयटीच्या या धडाकेबाज कारवाईनंतर या घोटाळ्यातील इतर संबंधितांवर देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version