Download App

…असा नशा करण्यापेक्षा भक्ती, कामाचा करा; फडणवीस अर्थसंकल्पात ‘रंग’ आणणार

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra)आणि देशातील सर्व जनतेला होळीच्या (Holi)शुभेच्छा देतो. होळी आणि रंगपंचमी (Rangpanchami)एक अशा प्रकारचं पर्व आहे, की ज्यामध्ये आपण होलिका देवीच्या ज्वालांमध्ये जे-जे वाईट आहे, ते आपण जाळून देतो आणि एक नवीन सुरुवात करतो. दुसरीकडं रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकांला एकमेकांच्या रंगामध्ये रंगवतो. हे जग सप्तरंगी आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं निश्चितपणे जसे होळीचे विविध रंग आहेत तसे आमच्या बजेटचे (Budget) वेगवेगळे रंग पाहायला मिळतील आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी म्हटलंय.

अनेकवेळी होळीला, मागच्याही काळामध्ये कोणी आमचे मित्र आहेत, त्यांना कोणीतरी खोटं सांगून भांग पाजून नेलं, त्यानंतर दिवसभर त्यांचं जे काही चाललं होतं कोणी दिवसभर गाणच म्हणत होतं, कोणी रडतच होतं, तसं पाहून मजा आली पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा करा, संगिताचा नशा करावा, कामाचा नशा करावा असा टोलाही लगावलाय.

Ajit Pawar : शिंदे-फडणवीसाकडून फक्त सरकार टिकवण्यासाठी धडपड!

यावेळी फडणवीस म्हणाले की, होळी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करतो. होळीच्या वेळी मी नागपूरमध्ये असतो पण यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळं (
Budget sessions)मुंबईमध्ये आहे. एका होळीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यांच्याबरोबर भाजप नेते मनोज तिवारी देखील सहभागी झाले.

पत्रकारांनी होळीमध्ये सर्व विरोधकांना माफ केलं जातं असं म्हणतात म्हटल्यावर फडणवीस म्हणाले की, आम्ही तर विधानसभेत म्हटलं होतं की, आम्हाला अनेक लोकांनी त्रास दिला त्याचा आम्ही बदला घेऊ आणि आम्ही त्याचा बदला घेतला आहे, आमचा बदला हा आहे की, आम्ही त्यांना माफ केलंय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात काहीच कटूता नाही.

राज्यातील अवकाळी पावसाबद्दल फडणवीस म्हणाले की, राज्यात अवकाळी पाऊस झाला ही चिंतेची बाब आहे. कमी भागांमध्ये हा पाऊस झाला असला तरी त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभं राहील असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Tags

follow us

वेब स्टोरीज