Download App

‘मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर पुजारी पळून जातील’; वडेट्टीवारांचं नवा वाद पेटवणारं विधान

Vijay Wadettivar : मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर मंदिराची देखरेख न करता पुजारी पळून जातील, असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी केलं आहे. परभणीत आयोजित कार्यक्रमात विजय वडेट्टीवार बोलत होते. दरम्यान, राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवरुन विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरुन आता नवीन वाद पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Traffic : पुढचे दोन दिवस पुण्यात जाणं आव्हान; बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीत बदल

विजय वडेट्टीवार म्हणाले, देशात सध्या जाती-जातींमध्ये भांडणं लावली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्विकारला असता तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते, मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर मंदिरांची देखरेख न करता हे पुजारी पळून जातील, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

महायुती सरकार केवळ घोषणाबाज…आकडे कोटींची अन् कामे शून्य… तनपुरेंचा हल्लाबोल

परभणीमधील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने थायलंड येथील पंचधातूच्या 6 फुटी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर विजय वडेट्टीवार बोलत होते.

Karnataka Politics : कर्नाटकात सावरकर vs नेहरू! सावकरांचा फोटो हटणार ? नेमकं काय घडलं?

परभणी दौऱ्यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतलायं. जिल्ह्याचं पाणी नियोजन करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या दौऱ्यादरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Israel Hamas War : गाझा पट्टीतील युध्द थांबवण्याची मागणी करणारा प्रस्ताव UN मध्ये मंजूर, अमेरिका मतदानासाठी गैरहजर

आमच्या हक्कासाठी आमची भूमिका :
सध्या राज्यात मराठा-ओबीसी बांधवांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जाहीर सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही सभा घेत आहेत. ओबीसी सभांबाबत भुजबळ सभा घेण्यासाठी ब्लॅकमेल करतायत का? त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, मला याबाबत संशय आहे, पूर्ण खात्री करून मी यावर बोलेल. तसेच, मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाची भूमिका मांडतायेत आणि आम्ही आमच्या हक्कासाठी आमची भूमिका मांडतोय. कुठेही द्वेष पसरवण्याबाबत आम्ही कुणाचेही समर्थन करत नाहीत. सर्वांनी एकमेकांचा आदर करावा. महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Tags

follow us